शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

postheadericon कळण्यापर्यंत

असं होत नाही कि 
तू खिडकीत येत नाहीस 
असंही होत नाही कि 
नजरेस नजर मिळत नाही 

कळण्यापर्यंत कळते तुला 
कळण्यापर्यंत कळते मला
वळण्यापर्यंत पण मनाला 
दोघांच्याही कळत नाही
मंगळवार, २० एप्रिल, २०१०

postheadericon charolya



title="The index of all Marathi blogs on the Internet"
src="http://marathiblogs.net/marathiblogs/referral_ping/8556/ca1917691b7ecaf5" />


शनिवार, १७ एप्रिल, २०१०
फुले उमलतात
रात्री
सकाळी
माळ्याची कात्री
आभाळातला एक ढग
व्याकुळ होऊन रडत होता
लोक आनंदात नाचत होते
म्हणे पाऊस पडत होता !
सोमवार, १२ एप्रिल, २०१०
घडवणारे घडवीत जातात
दडवणारे दडवीत जातात
घडवून गेल्यावर घडवणारांनाही
दडवणारे दडवीत जातात
तगमग जरी होत असली
तरी तग मग धरावी लागते
कारण तिची तगमग बघवत नसते
जी आपली तगमग बघते
खोल मनात दाटतं काही
अन नकळत मारतं उफाळी
शब्द-शब्दांना देतात टाळी
भावनांच्या रांगोळीचीच बनते चारोळी